अर्थसंकल्पात पोकळ आश्‍वासने : चोडणकर

0
187

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. पोकळ आश्वासनांनी भरलेला, निधीची तरतूद न करता रोजगार निर्मितीचे आश्वासन देणारा आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून अर्थसंकल्प सादर केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोकळ आश्वासने देवून हे सरकार लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ह्या अर्थसंकल्पावरून भाजप सरकारने अर्थसंकल्प विकासासाठी नव्हे, तर निवडणूक ङ्गायद्यासाठी वापरला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी जाहीर केलेल्या बर्‍याच योजनांची अर्थसंकल्पात पुनरावृत्ती केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोणताही विचार न करता केलेली एक प्रक्रिया आहे. अर्थसंकल्प काल्पनिक आणि अवास्तव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.