राज्यात काल मंगळवारी कोरोनामुळे तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८२१ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल १३३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५६,८४१ एवढी झाली आहे. तर सध्याच्या रुग्णांची संख्या १०८९ एवढी झाली आहे.
काल राज्यात ५८ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५४,९३१ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६३ टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल खात्यातर्फे १९०१ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
कोरोना संसर्ग झालेल्या १६,२५९ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ३०,५८८ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५,२९,००७ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
सर्वाधिक रुग्ण पणजीत
उत्तर गोव्यात पणजीत व दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पणजीत १४७ रुग्ण असून मडगावात रुग्णसंख्या ११२ झाली आहे. पर्वरीत ६८, कांदोळी ६१, म्हापसा ५१, चिंबलमध्ये ४० रुग्ण आहेत. फोंड्यात १०८, वास्को ७०, कासावली ५०, कुठ्ठाळीत ५५ जण उपचार घेत आहेत.