मिरामारमधील पर्रीकरांचे समाधी स्थळ लवकरच पूर्ण ः मुख्यमंत्री

0
166

गोव्याचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथील समाधी स्थळाचे बांधकाम येत्या पाच-सहा महिन्यात पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दुसर्‍या पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळी आदरांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर समाधी स्थळाच्या बांधकामाला विलंब झाला आहे. स्व. पर्रीकर यांच्या विचाराप्रमाणेच राज्यातील भाजप सरकार वाटचाल करीत आहे. पर्रीकर यांची उणीव सदैव भासणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रीग्स, महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, महापौर उदय मडकईकर व इतरांची उपस्थिती होती.
भाजपच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.