शेतकरी आंदोलन एवढ्या दीर्घकाळ चालणे कोणाच्याही फायद्याचे नाही. एखाद्या जरी शेतकर्याचा मृत्यू झाला तरी ती दु:खद गोष्ट असल्याचे मेघायलचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. एका खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर बोलत होते. आंदोलनात २५० शेतकर्यांचा मृत्यू झाला तरी कोणी काही बोलत नाही हे फार वेदना देणारे आहे असेही मलिक यावेळी म्हणाले. राज्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याची गरज असून चर्चा करुन या प्रश्नावर तोडगा शोधता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.