मार्चच्या १५ दिवसांत राज्यात कोरोनाचे १०७४ नवे रुग्ण

0
91

>> गेल्या पंधरा दिवसांत १३ जणांनी जीव गमावला

>> सध्या ७७५ रुग्ण

ाज्यात १ ते १५ मार्च ह्या १५ दिवसांत कोरोनाचे तब्बल १०७४ नवे रुग्ण आढळून आले असून तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसत असून मुख्यत्वे पणजी आणि मडगाव ह्या शहरांत हे रुग्ण वाढले आहेत.

राज्यात चोवीस तासांत नवे ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७७५ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८०७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ५६ हजारांचा टप्पा पार केला आहे.

२६ वर्षीय युवकाचा मृत्यू
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये मोर्ले – सत्तरी येथील २६ वर्षीय युवकाचा कोरोनाने काल मृत्यू झाला. अन्य आजार असलेल्या या रुग्णाला गेल्या १३ मार्चला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,००६ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ६२ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५४ हजार ४२४ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१७ टक्के एवढे आहे. राज्यात कोरोना स्वॅबच्या चाचण्यांमध्ये वाढ होत नाही. साधारण दीड हजाराच्या आसपास स्वॅबच्या चाचण्यांची तपासणी होत आहे.

चोवीस तासांत नवीन १,३५४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ६.५७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४० जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०६ इतकी आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. पर्वरीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३८ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ४६ रुग्ण, म्हापसा ५७ रुग्ण, वास्कोत ५५ रुग्ण, कासावली ४२ रुग्ण, कुठ्ठाळीत ३६ रुग्ण, कांदोळी २९ रुग्ण, खोर्ली २४ रुग्ण, डिचोली २५ रुग्ण आहेत.

पणजी आणि मडगावात रुग्णांत मोठी वाढ
पणजीत मार्च महिन्याच्या प्रारंभी रुग्णसंख्या ४८ च्या आसपास होती, ती गेल्या पंधरा दिवसांत प्रति दिनी १२२ पर्यंत वाढली. कालच्या दिवशी पणजीत १०६ कोरोना रुग्ण असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्या खालोखाल मडगावचे प्रमाण आहे. मडगावात मार्चच्या प्रारंभी ८६च्या आसपास कोरोना रुग्णांचे प्रमाण होते ते पुढील दिवसांत कमाल १०८ पर्यंत वाढले. काल मडगावात १०४ रुग्ण होते. राज्यात सध्या ७७५ सक्रिय रुग्ण असले तरी काही दिवसांपूर्वी ही संख्या ७९९ पर्यंत गेेलेली होती. केंद्र सरकारने निर्देश देऊनही राज्यात कोरोना तपासण्यांचे प्रमाण कमी आहे.