>> मंगळवारी तिघांचा मृत्यू, पणजी, मडगावात रुग्ण वाढले
राज्यात काल मंगळवारी कोरोनामुळे तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८०२ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ७५ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५५,५३६८ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ६६३ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५४,०७३ एवढी झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल खात्यातर्फे १५६९ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोना संसर्ग झालेल्या १६,०६२ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २९,७५४ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५,०६५,०७ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ४३ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर १३ जण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.
पणजी, मडगावात
रुग्णसंख्या वाढली
उत्तर गोव्यात पणजीत व दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १०३ एवढे रुग्ण असून चिंबलमध्ये ४५, म्हापसा ४३, तर पर्वरीत ३७ रुग्ण आहेत. फोंड्यात ३९, वास्कोत ३७, कुठ्ठाळीत २८ जण उपचार घेत आहेत.