पश्‍चिम बंगालमध्ये २०० गावठी बॉम्ब जप्त

0
70

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण एकदम गरम झालेले असतानाच पोलिसांनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका गावातून २०० गावठी बॉम्ब जप्त केले आहेत या बॉम्बचा वापर कुठे करण्यात येणार होता याचा तपास काशीपूर पोलीस करत आहेत. गेल्याच आठवड्यात दक्षिण २४ परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडला होता. तसेच यावेळी पाचजण जखमी झाले होते. त्यातील दोघेजण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी जेवण करत असताना आमच्यावर कोणीतरी बॉम्ब फेकले असा आरोप जखमी झालेल्या एका कार्यकर्त्याने केला. तसेच भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर आरोप केले आहेत.

आमदार सोनाली गुहा
लवकरच भाजपमध्ये?

दरम्यान, निवडणुकीपूर्वी तृणमूलचे अनेक नाराज कार्यकर्ते, नेते व आमदार तसेच मंत्रीही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ममता यांना धक्के बसत असून आता दक्षिण २४ परगणामधील तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार सोनाली गुहा ह्या उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षावर नाराज आहेत. त्याही आता लवकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोनाली ह्या ममतांच्या सर्वात जवळच्या सहकारी मानल्या जातात. मात्र यावेळी गुहा यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या आहेत.