तिन्ही प्रकल्पांवर ङ्गेरविचार करण्याची विरोधकांची मागणी

0
87

राज्य विधानसभेत आमदार विजय सरदेसाई आणि आलेक्स रेजिनाल्ड यांच्या खासगी ठरावानंतर मोले राष्ट्रीय पार्क, महावीर अभयारण्यातील नियोजित रेल्वे दुपदरिकरण, वीज प्रकल्प, महामार्ग रुंदीकरण या तीन प्रकल्पावर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी पर्यावरणाची चिंता व्यक्त करून तीन प्रकल्पांचा ङ्गेरविचार करण्याची मागणी केली. तर, सत्ताधारी गटाने तिन्ही प्रकल्पाचे समर्थन केले. सत्ताधारी भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी रेल्वे मार्ग दुपदरिकरणाला विरोध केला.

गोव्यातील आगामी काळातील विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मोलेतील वीज प्रकल्प आवश्यक आहे. प्रकल्पांना विरोध करताना पर्यावरणाचा प्रश्‍न पुढे करून नाहक गाजावाजा केला जात आहे, असा दावा पर्यावरण, वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केला.

बांधकाममंत्री पाऊसकर यांनी तीन प्रकल्पांचे जोरदार समर्थन केले. तर, भाजपच्या आमदार साल्ढाणा यांनी रेल्वे दुपदरिकरणाला विरोध केला. वारसा घरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना कोळसा प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असून दक्षिण गोव्याचे विभाजन होणार असल्याचा दावा केला.
सरकारने लोकांच्या विरोधाची दखल घेऊन प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

सरकारतर्फे कोळसा वाढवू न देता तो कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तीन प्रकल्प राज्याच्या हितासाठी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.