डॉ. मोहन भागवत आजपासून गोव्यात

0
207

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज शुक्रवार दि. २९ ते रविवार दि. ३१ जानेवारीपर्यंत तीन दिवस गोवा दौर्‍यावर येणार आहेत. कोकण प्रांतात कोरोना काळात संघाच्या व संबंधित संघटनांच्या माध्यमातून झालेल्या मदत कार्याचा ते या तीन दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेणार आहेत. कोकण प्रांतातील विविध संघकार्यकर्त्यांसोबत डॉ. भागवत हे बैठका घेणार असून कोरोनातील मदतकार्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा केली जाणार आहे. गोव्यातील विविध मान्यवरांशी ते या दौर्‍यात संवाद साधणार आहेत.