प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांना रोखायचे की नाही ते पोलिसांनी ठरवावे

0
194

>> सर्वोच्च न्यायालयातर्फे स्पष्टीकरण

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यास प्रवेश द्यावा की नाही हा निर्णय पोलिसांनी घ्यायचा आहे असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने काल केले. अशा प्रकारची रॅली काढण्यास मनाई करावी या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मतप्रदर्शन केले आहे. कोणाला प्रवेश द्यायचा व किती लोकांना प्रवेश द्यायचा हे दिल्ली पोलिसांनी ठरवायचे आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. पोलिसांना पोलीस कायद्याखाली अधिकार आहेत हे न्यायालयाने सांगण्याची आवश्यकता आहे असे सरकारला वाटते का असा सवालही न्यायालयाने केला. या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांद्वारे सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सादर करून केंद्र सरकारने म्हटले होते की, प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बाधा आणण्याचा प्रयत्न देशासाठी मानहानीकारक ठरेल. आंदोलक शेतकरी संघटना मात्र ट्रॅक्टर रॅलीवर ठाम आहे.