>> विद्यमान रुग्णसंख्या हजाराहून कमी
ण आढळून आले असून राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५०,६६७ एवढी झाली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९४४ एवढी आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ७९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात चोवीस तासात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही.
राज्यात नवीन १३२९ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ३ लाख ९२ हजार ४१३ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील आणखी ७९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८,९९२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६९ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या १५ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारलेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ४९३ एवढी झाली आहे. इस्पितळामध्ये नवीन ४० कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ८६ कोरोना रुग्ण आहेत. पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५८ कोरोना रुग्ण आहेत. पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ७४ रुग्ण, केपे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५१ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील २७५ खाटा आणि दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील ३९ खाटा रिक्त आहेत.
२४ तासांत कोरोनाने
एकही मृत्यू नाही
राज्यात चोवीस तासांत एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत एकूण ७३१ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात डिसेंबर महिन्यातील २७ दिवसात आतापर्यंत ४३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्यात कोरोना मृत्यूबरोबरच नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.