गोव्यात निर्मिती झालेल्या चित्रपटांना विशेष विभाग

0
225

>> इफ्फीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुढील महिन्यात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोव्यात निर्मिती झालेल्या मराठी व कोकणी चित्रपट आणि लघुपटांसाठी विशेष विभाग असेल असे मनोरंजन संस्थेने काल स्पष्ट केले.

दि. १ नोव्हेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत तयार झालेल्या व बोर्डाचे सेन्सॉर प्रमाणपत्र असलेल्या व नसलेल्याही चित्रपटांना व लघुपटांना या विभागात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीने काल दिली.

इच्छुक चित्रपट निर्मात्यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या ुुु.शीस.ले.ळप या इमेल आयडीवर दि. ४ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन संस्थेने केले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होणारा इफ्फी यंदा कोरोनामुळे पुढे ढकळण्यात आला असून तो आता १६ ते २४ जानेवारी या दरम्यान होणार आहे.

कोकणी चित्रपट नाही
दरम्यान, यंदा इंडियन पॅनोरमा विभागात एकाही कोकणी चित्रपटाला स्थान मिळू शकलेले नाही.