काबूलमध्ये बॉम्बस्फोटात ९ नागरिक ठार, २० जखमी

0
259

काल रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विविध भागात पाच बॉम्बस्फोट झाले. यात ९ नागरिक ठार झाले तर २० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचे गृहमंत्री मसूद अंदाराबी यांनी या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
शनिवारी अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात अमेरिकेचा एअरबेस असलेल्या बगराम एयरफील्डवर दहशतवाद्यांकडून रॉकेटचा मारा केला होता. मात्र त्यात कोणतेच नुकसान झाले नव्हते. काबूलमध्ये काल बॉम्बस्फोटाची जबाबदारी तसेच एअरबसवरील हल्लयाचीही जबाबदारी कोणत्याच संघटनेने स्वीकारलेली नाही.