नेपाळची संसद विसर्जित

0
227

>> एप्रिलमध्ये होणार निवडणूक

नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देव भंडारी यांनी संसद विसर्जित करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस मान्य केली असून सोबत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली आहे. एप्रिल-मे महिन्यात दोन टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे.

रविवारी सकाळी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसद विसर्जित करण्याचा ठराव मंजूर करून राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर राष्ट्रपती भवनने हा प्रस्ताव मान्य केला. यानंतर मध्यावधी निवडणूक जाहीर करताना ३० एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात आणि १० मे रोजी दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार असल्याचे सांगितले.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपत्कालीन बैठक काल सकाळी १० वाजता बोलावली होती. या बैठकीत अचानक संसद विसर्जित करण्याचा निर्णय पंतप्रधानांनीजाहीर केला.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. ओली यांच्या निर्णयामुळे नेपाळमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने कॅबिनेटच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री उपस्थित नव्हते. हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून देशाला मागे नेण्याचा प्रकार असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे.