दोनापावला येथे ५ हजार प्रेक्षक बसू शकतील एवढ्या क्षमतेचे परिषदगृह उभारण्यासाठी गोवा सरकारने आरएफपी जारी केले आहे. बांधा, अर्थपुरवठा करा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर ही आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) काढण्यात आले आहे.
या परिषदगृह इमारतीत मल्टिप्लेक्स, ५०० खोल्यांचे हॉटेल, मॉल आदींची सोय असेल. या प्रस्तावासाठी दोनापावला येथे २४ एकर एवढा जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ही संकल्पना असून पणजी शहरात होणार्या इफ्फीचे दोनापावला येथे स्थलांतर करण्यासाठी त्यांनी या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते व त्याला मूर्त रूप देण्यासाठी वरील प्रकल्पाची संकल्पना तयार केली होती.