भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. नड्डा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. माझी तब्येत ठीक असून होम आयसोलेशमध्ये मी सर्व निर्देशांचे पालन करत असल्याचेही ते म्हणाले. श्री. नड्डा नुकतेच पश्चिम बंगालच्या दौर्यावर गेले होते. तेथे त्यांनी निवडणूक प्रचारसभेला संबोधित केले होते.
यापूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री, अर्जुनराम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांना देखील करोनाची लागण झालेली होती. मात्र, या सर्व नेत्यांनी या आजारावर मात केलेली आहे.