कोरोनाने राज्यात काल १ बळी

0
237

काल रविवारी राज्यात कोरोनामुळे एकाचा बळी गेला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७०६ झाली आहे. तसेच काल राज्यात कोरोनाबाधित नवे ५७ रुग्ण सापडल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३६२ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाचे सध्याचे रुग्ण १०६६ एवढे असल्याचे आरोग्य खात्याने पत्रकात म्हटले आहे.

काल दिवसभारत १०१ जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील संख्या ४७ हजार ५९० झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४१ टक्के एवढे आहे.
आतापर्यंत ३,७०,६९० एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,८२८ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २५,६१७ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.