शेतकर्‍यांसोबत आज होणार सहावी बैठक

0
263

शेतकर्‍यांकडून दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून काल शेतकर्‍यांनी भारत बंदचा नारा दिला. त्यानुसार भारत बंद आंदोलन शांततेेने पार पडले. त्यांत आर दि. ९ रोजी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वी शेतकर्‍यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल तातडीची बैठक बोलावली होती. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीनंतर कोंडी फुटून काही तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भारत बंदबरोबर शेतकरी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे आज होणार्‍या सरकार आणि शेतकर्‍यांच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.