१३.५५ लाखांची वाळू मायणा – कुडतरीत जप्त

0
207

मायणा-कुडतरी येथे बेकायदा उत्खनन करून काढण्यात आलेली १३ लाख ५५ हजार रुपये एवढ्या किमतीची वाळू काल खाण खात्याने जप्त केली. मायणा-कुडतरी येथील कपेलजवळ असलेल्या नदीतून ही बेकायदा वाळू काढण्यात आली होती.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. खाण खात्याने यावेळी मायणा-कुडतरी पोलिसांची मदत घेतली होती. पोलिसांनी वाळू उत्खननानंतर ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या ६ होड्या व अन्य साहित्य जप्त करत गुन्हा नोंद केला आहे. गेल्या महिन्यात मायणा-कुडतरी पोलिसांनी अशा प्रकारे बेकायदा वाळू उत्खनन केल्याप्रकरणी तिघांना अटक केली होती.