गोव्याजवळ अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या नौदलाच्या मिग-२९ के चे वैमानिक निशांतसिंग यांचा मृतदेह दुर्घटनेनंतर तब्बल अकरा दिवसांनी काल आढळून आला. सिंग यांचा मृतदेह गोव्याच्या किनार्यापासून तीस मैलांवर समुद्रात ७० मीटर खोल समुद्रतळाशी आढळून आल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली आहे. सदर मृतदेह शोधण्यासाठी नौदलाने अथक शोधमोहीम चालवली होती.
कमांडर सिंग यांच्या कुटुंबियांना मृतदेह सापडल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली. सदर मृतदेह सिंग यांचाच आहे याची खातरजमा करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
कमांडर सिंग यांचे विमान २६ नोव्हेंबरला दुर्घटनाग्रस्त झाले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते. आयएनएस विक्रमादित्यवरून या विमानाने उड्डाण केले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते कोसळले होते.