आपल्या मागण्यासाठी गेल्या बर्याच काळापासून संपावर असलेल्या जीवरक्षकांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळाखाली सामावून घेतले जाईल, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळाखाली सामावून घेण्यात येणार असल्याचे आपण त्यांना यापूर्वीच दोन तीन वेळा सांगितलेले आहे, असे सावंत काल म्हणाले.
सध्या नोकरभरतीवर बंदी असल्याने त्यांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही, मात्र, आता पदांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी काल स्पष्ट केले.