तमनार प्रकल्पाचा बांधकाम परवाना न्यायालयाकडून रद्द

0
95

सांगोडा येथील वीज उपकेंद्रासाठी तमनार वीजवाहिन्यांच्या प्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेला बांधकाम परवाना काल उच्च न्यायालयाने रद्द ठरवला. मोले पंचायतीच्या सरपंचांनी पंचायतीत ठराव न घेताच हा बांधकाम परवाना मंजूर केल्याचा आरोप होता, त्यामुळे काल उच्च न्यायालयाने हा परवाना एका आदेशाद्वारे मागे घेतला.
आता या प्रकल्पाच्या बांधकामासाठीचा परवाना मिळवण्यासाठीचा ठराव पंचायतीपुढे ठेवावा लागणार आहे.

तमनार वीज उपकेंद्राच्या प्रकल्पासाठी मोले येथील जंगलातून वीजवाहिन्या ओढाव्या लागणार असल्याने सरकारने या जंगलातील हजारो झाडे कापण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोव्याबरोबरच देश-विदेशांतून या प्रकल्पाला विरोध होऊ लागला होता. समाजमाध्यमांवरून गोव्याबरोबरच देश-विदेशातील गोमंतकीयांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरवात केली होती.