महिलांसाठी गोवा पोलिसांची व्हॉटस् ऍप हेल्पलाईन सुरू

0
196

>> ७८७५७५६१७७ या क्रमांकावरून होणार मदत

खास महिलांसाठीच्या गोवा पोलिसांच्या व्हॉटस् ऍप हेल्पलाइन क्रमांकाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आला. राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांना थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याप्रसंगी बोलताना दिली.

पोलीस खात्याकडून नागरिकांच्या मदतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी वॉट्‌सऍप क्रमांक ७८७५७५६१७७ हा कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधणार्‍यांना त्वरित मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक महिलेने हेल्पलाईन क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा. या हेल्पलाईन क्रमांकाबाबत विमानतळ, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी विद्यालये, महाविद्यालये व इतर ठिकाणी जनजागृती करावी.

राज्यात येणार्‍या देशी, विदेशी पर्यटकांना सुध्दा हा हेल्पलाईन क्रमांक सेव्ह करण्याची विनंती करावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात मागील सोळा महिन्यांत अमली पदार्थाच्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंतचा जास्तीत जास्त अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे. राज्यात अमली पदार्थाला थारा दिला जाणार नाही. यापूर्वी, राज्यात अमली पदार्थाविरोधात कडक कारवाई केली जात नव्हती, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.