बंगाली चित्रपटांचे एक महानायक सौमित्र चटर्जी यांचे काल कोरोनाने निधन झाले. सत्यजित राय यांचे सहकारी म्हणून काम केलेल्या चटर्जी यांनी त्यांच्यासोबत चौदा चित्रपट केले होते. चटर्जी यांना कोरोना झाल्याचे गेल्या पाच ऑक्टोबरला स्पष्ट झाले होते. तेव्हापासून ते आजारी होते. ११ ऑक्टोबरला त्यांच्यावर दोनदा प्लाझ्मा उपचार करण्यात आले होते, परंतु ते निष्फळ ठरले. १२ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर अहोरात्र देखरेख ठेवून होते.
चटर्जी यांनी १९५९ साली सत्यजित राय यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटाद्वारे चित्रपटांच्या दुनियेत पदार्पण केले होते. ‘सोनार किल्ला’(१९७४) व ‘जोय बाबा फेलुनाथ’ (१९७९) या दोन चित्रपटांत सत्यजित राय यांची सुप्रसिद्ध ‘फेलुदा’ ची भूमिका त्यांनी रंगवली होती. त्यांना पद्मभूषण व दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारही लाभला होता.