गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने म्हापसा येथे छापा टाकून सुमारे ५ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ब्रिजेश कुमार यादव (२६ वर्षे, मूळ जौनपूर उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. संशयित ब्रिजेश यादव हा युवक म्हापसा येथे भाड्याच्या खोलीत राहत असून गोव्यात पर्यटन मोसमाला सुरुवात झाल्याने तो गांजा घेऊन आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.