नैऋत्य मोसमी पाऊस २८ पर्यंत माघारी परतेल हवामान खात्याचा अंदाज

0
259

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने काल वर्तविला आहे.
या वर्षी मोसमी पाऊस कधी माघारी परतणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर भारतातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मोसमी पाऊस परततो, परंतु, यावर्षी कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे मोसमी पावसाच्या परतीला विलंब झाला. या वर्षी गोव्यात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सर्वाधिक १६५ इंच पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुध्दा साडेसात इंच पावसाची नोंद झाली आहे. ‘ऑक्टोबर हिट’ ऐवजी या महिन्यात पावसाला तोंड द्यावे लागले.