पर्वरी येथील तोर्डा परिसरातील एका घरातून आयपीएल क्रिकेट बेटिंग करणार्या मध्यप्रदेशातील दोघांना पर्वरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांनी रोख रक्कम, बेटिंगचे साहित्य आणि मोबाईल संच ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल बुधवार दि. २१ रोजी विश्वसनीय सूत्राकडून साईनगर, तोर्डा येथील एका इमारतीत आयपीएल बेटिंग चालल्याचे पर्वरी पोलिसांना कळविले. त्या माहितीच्या आधारे बुधवारी उपनिरीक्षक निखिल पालेकर आणि प्रतीक भट यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला आणि दोन इसमांना ताब्यात घेतले. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी असून त्यांची नावे गोपाळ बापचंदानी आणि रुपचंदानी अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम २२ हजार ४८०, पाच मोबाईल संच आणि इतर साहित्य जप्त केले असून नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.