पोलिसांवर हल्ला केलेल्या दोन्ही संशयितांना अटक

0
236

कुर्टी – फोंडा सोमवारी संध्याकाळी फोंड्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे व कॉन्स्टेबल जयवंत भर्तू या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला दोघाजणांनी पळ काढला होता. त्या दोन्ही संशयितांना काल मंगळवारी फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

कुर्टीतील हल्ला प्रकरणाशी संबंधित असलेला संशयित आरोपी पंडितवाडा – फोंडा येथील शुभम नाईक (२८) व मूळ नेपाळ येथील पण सध्या फोंडा येथे वास्तव्य असलेल्या कृष्णा खडका (३०) यांना पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले. या हल्ल्यातील गंभीर जखमी जितेंद्र गावडे यांच्यावर बांबोळी इस्पितळात उपचार सुरू असून जयवंत भर्तू यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
फोंडा पोलीस स्थानकात गेल्या मार्चमध्ये खडपाबांध – फोंडा येथे घरात चोरी झाल्याचे प्रकरण नोंद झाले होते. या घरफोडी तसेच अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी संशय असल्याने फरारी संशयितांच्या शोधात पोलीस होते. घरफोडीप्रकरणीचा संशय शुभम नाईक याच्यावर होता, मात्र तो फरारी झाल्यानंतर सापडला नव्हता.

संशयित शुभम हा कुर्टी येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कुर्टीला गेले होते. त्यावेळी शुभम नाईक याने पोलिसांना ढकलून पळ काढला. मात्र कृष्णा याने पोलिसांवर बाटलीने हल्ला केला. यात जितेंद्र गावडे हे गंभीर झाले. यावेळी दोन्ही संशयितांनी दोन दिशांनी पळ काढला होता.

फोंडा पोलीस सोमवारी रात्रभर या दोघांचा तपास करत होते. काल रात्रभर लावला. अखेर काल मंगळवारी कृष्णा हा पत्रादेवी येथे असल्याचे आढळून आल्यावर त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले. तर शुभम हा कर्नाटकात पळाल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्याला बेळगावात ताब्यात घेतले. दोघांनाही फोंडा पोलीस स्थानकात आणून त्यांची चौकशी सुरू आहे.