आयआयटी प्रकल्पाच्या स्वागतास सांगे मतदारसंघ सज्ज ः गावकर

0
248

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयआयटी संकुल कुठे उभारायचे याचा निर्णय घेतला पाहिजे. सांगे मतदारसंघात आयआयटीचे स्वागत करण्याची आपली आजही तयारी आहे, अशी प्रतिक्रिया सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी काल व्यक्त केली.
सत्तरी तालुक्यातील मेळावली – गुळेली येथे आयआयटी संकुल उभारण्यास स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या एका प्रश्‍नावर बोलताना आमदार गावकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगे मतदारसंघात आयआयटी संकुल उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. आयआयटी संकुलासाठी महसूल खाते, वन खाते आणि एका खासगी सोसायटीची जमीन अशा तीन जागाही सुचविण्यात आल्या होत्या. महसूल खात्याच्या जमिनीतील असलेल्या काही जणांचे पुनर्वसन करण्याची गरज होती. तथापि, आवश्यक तोडगा काढण्यात सरकारी यंत्रणेला यश प्राप्त झाले नाही. त्यानंतर हा प्रकल्प सत्तरीत नेण्यात आला असेही आमदार गावकर यांनी सांगितले. मेळावली गुळेली येथील परिस्थितीवर भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.