दूर्गापूजा मंडपांमध्ये भाविकांना प्रवेशबंदी

0
258

पश्‍चिम बंगालमधील सर्व दूर्गापूजा मंडपांमध्ये भाविकांना प्रवेशबंदी जारी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने काल दिले. मोठ्या पूजा मंडपांना १० मीटर दूरवरच प्रवेश बंदी करण्यास सांगण्यात आले आहे, तर छोट्या मंडपांना पाच मीटरवर ती लागू होईल. सर्व पूजा मंडपांनी ‘प्रवेश बंदी’ असल्याचे फलक लावण्यासही सांगण्यात आले आहे. पूजा मंडपाच्या आत पंचवीसहून अधिक कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये असेही न्यायालयाने फर्मावले असून त्यांची नावेही जाहीर करावी लागणार आहेत. कोरोनाच्या संदर्भातील एका याचिकेवर हा निवाडा आला आहे. दूर्गापूजा समित्यांना दिल्या गेलेल्या देणग्यांबाबत सरकारलाही जाब विचारण्यात आला आहे.