लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले

0
86

लडाखमधील देमचोक भागामध्ये भारतीय लष्कराने एका चिनी सैनिकाला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळ लष्कराशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या या सैनिकाचे नाव वांग या लॉंग असे आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याने या सैनिकाला ताब्यात घेण्यात आल्याचे भारतीय लष्कराने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. चिनी लष्कराकडून या बेपत्ता सैनिकाबाबत विचारणा झाली असून त्याला परत पाठवले जाणार असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. लष्करी शस्त्रास्त्रे दुरुस्त करण्याचे काम सदर सैनिक करतो अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.