दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना कृषी खात्याअंतर्गत आणण्यासंबंधीची अधिसूचना काल जारी करण्यात आली आहे.
हा संजीवनी साखर कारखाना गेली कित्येक वर्षे सहकार खात्याच्या अंतर्गत कार्यरत होता. राज्य मंत्रिमंडळाच्या मागील महिन्यात घेण्यात आलेल्या बैठकीत हा साखर कारखाना कृषी खात्याच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सहकार आणि कृषी या दोन्ही खात्यात कारखाना चालविण्याबाबत योग्य समन्वय होत नसल्याने हा कारखाना कृषी खात्याकडे आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कृषी खाते हा साखर कारखाना कशा प्रकारे चालविणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.