राज्यात सौरऊर्जा प्रकल्पांस मान्यता

0
245

राज्यात सौरऊर्जा प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून साळावली, अंजुणे आदी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पीपीपी सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

वाशी मुंबई येथील गोवा भवनाच्या जागेबाबत गोंधळाचे वातावरण आहे. गोवा भवनासाठी फार पूर्वी जागा देण्यात आली होती. संबंधितांना जागेची पुन्हा एकदा पाहणी करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पणजी बसस्थानक नवीन प्रकल्पाला अजून मान्यता देण्यात आलेली नाही. पर्यटन सचिवांना या प्रकल्पाचा सखोल अभ्यास करून पुन्हा सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दोनापावल येथील नियोजित कन्वेशन सेंटर प्रकल्पाबाबत आवश्यक सूचना करण्यात आलेल्या आहे. हा प्रकल्प पहिल्यांदाच पीपीपी सुकाणू समितीकडे आला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील साळावली, अंजुणेसारख्या धरणांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आल्यास त्याला मान्यता दिली जाणार आहे. धरणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.