>> संशयिताला पोलिसांकडून अटक
शनिवारी रात्री खारेबांध येथे भंगार गोळा करणार्या दोन मित्रांमध्ये पैशांवरून झालेल्या भांडणात यल्लाप्पा करबाल याने आपला साथिदार कुमार याचा धारधार शस्त्र पोटात खुपसून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित यल्लापा याला रविवारी पहाटे अटक केली.
यल्लापा व कुमार हे दोघे भंगार गोळा करण्याचे काम करीत असत. शनिवारी रात्रौ अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास खारेबांध येथील जॉन्सन बारलगत दोघांचे भांडण झाले. त्या रागाच्या भरात यल्लाप्पा याने कुमार याच्या पोटात सुरा खुपसून त्याचला गंभीर जखमी केले. पोलिसांना जोजफ कुलासो यांनी फोनवरून या घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर पोलीस फाट्यासह तेथे जाऊन कुमारला इस्पितळात दाखल केले.
मात्र त्यापूर्वी तो मरण पावला होता. खून करून यल्लाप्पा पळून गेला होता. पोलिसांनी सर्वत्र शोध करून पहाटे त्याला कोकण रेल्वे स्थानकानजीक रेल्वे मार्गावर पकडले. कुमारने यल्लाप्पाकडून एक हजार रुपये घेतले होते. ते पुन्हा मागितले मागितले असता रागाने यल्लाप्पा याने कुमार याच्या पोटात सुरा खुपसून खून केला. पोलिसांनी या प्रकरणी यल्लाप्पा याला अटक केली.