सावंतवाडीच्या प्रसिद्ध लाकडी खेळण्यांवर आधारित टपाल खात्यातर्फे नऊ फोटो पोस्टकार्डचा संच बनवण्यात आला आहे.
आज दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. या संचाचे नऊ राज्यांमधून ऑनलाईन प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्रचे एच. सी. अग्रवाल हे या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये याबाबत उल्लेख केला होता. यापासून प्रेरणा घेऊन टपाल खात्याने १५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
इंडिया पोस्टच्या पोस्टक्रॉसिंग सोसायटी ऑफ इंडियातर्फे या पोस्टकार्डचे ऑनलाईन प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.