पणजी परिसरात नवे २२ रुग्ण

0
116

पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो, रायबंदर, पणजी चर्च परिसर, टोक, करंजाळे आदी भागातून नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मडगाव आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४३३ एवढे आहेत. साखळी येथे ४१२ रुग्ण, पर्वरी येथे ४०१ रुग्ण, पणजी येथे ३३९ रुग्ण, वास्को येथे ३१९ रुग्ण, कुठ्ठाळी येथे २७२ रुग्ण, म्हापसा येथे २७८ रुग्ण, वाळपई येथे २३३ रुग्ण, पेडणे येथे २२६ रुग्ण, डिचोली येथे २१७ रुग्ण, चिंबल येथे २२७ रुग्ण, शिवोली येथे २१३ रुग्ण आहे. इतर ठिकाणी दोनशेपेक्षा कमी रुग्ण आहेत.