५१ वा चित्रपट महोत्सव लांबणीवर

0
104

राज्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान होणारा ५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्यात आला असून इफ्फीचे आयोजन १६ ते २४ जानेवारी दरम्यान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी इफ्फी आयोजनाच्या विषयावर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचा इफ्फी व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष कार्यक्रम अशा दोन पातळ्यांवर आयोजित करण्यावर विचार विनिमय सुरू आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून कार्यक्रम आयोजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

गोव्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा नोव्हेंबरमहिन्यात इप्फीचे आयोजन करता येणार नसल्याचे जाणवल्यामुळे जावडेकर यांनी जानेवारीत गोव्यात इफ्फीचे आयोजन करण्यातयेऊ शकते असे सरकारला सांगितले. मात्र व्हर्च्युअल आणि प्रत्यक्षात अशा स्वरूपाचा हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून कोविडशी संबंधित सर्व सूचना व प्रक्रियेचे इफ्फीच्या वेळी पालन करण्यात येईल अशी माहिती सरकारने दिली. गोवा मनोरंजन स्संथेने यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात र्व्ह्च्युअल पद्धतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे असे म्हटले होते. मात्र केंद्र सरकारने कोरोना महामारीचा धोका लक्षात घेत इप्फीचे आयोजन पुढे ढकलले आहे.

तयारी सुरू
दरम्यान, इफ्फीच्या आयोजनासंबंधी पणजी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्सचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. इफ्फी लांबणीवर गेल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. इफ्फीसाठी दोनापावल येथे नवा मल्टिप्लेक्स बांधणे, कन्वेन्शन सेंटरची सोय किंवा इफ्फीसाठी अन्य सुविधा अजून सरकारला उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.