५९० बाधितांसह राज्यात ८ मृत्यू

0
279

>> चोवीस तासांत ७३६ कोरोनामुक्त

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवे ५९० रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा मृत्यू काल झाला आहे. चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह आणखी ७३६ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३,४६२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७९.९६ टक्के एवढी आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २९,३४३ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५५१३ एवढी आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ३६८ झाली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १८६३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ५९० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ४० हजार २०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

राज्यात आणखी ८ रुग्णांचा बळी गेला आहे. जीएमसीमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या दोन रुग्णांचा केवळ अर्ध्या तासात मृत्यू झाला आहे.

सांतइनेज पणजीतील दोघांचा बळी
सांतइनेज – पणजी येथील ६९ वर्षांची महिला रुग्ण, सांतइनेज येथील ५९ वर्षांचा पुरुष रुग्ण, वास्को येथील ६९ वर्षांचा पुरुष रुग्ण, चांदोर येथील ६० वर्षांचा पुरुष रुग्ण, सांतइस्तेव येथील ८३ वर्षांची महिला रुग्ण, कणकवली येथील ३२ वर्षाच्या पुरुष रुग्ण, वाळपई येथील ८७ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि मांगूरहील वास्को येथील ७९ वर्षांची महिला रुग्णाचे निधन झाले आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी २९० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २३९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.