>> कॉंग्रेस पक्षाने काल मोठे फेरबदल करताना अलिकडेच सोनिया
गांधींविरुद्ध बंडाचे निशाण उभारलेले ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवले आहे. अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश कॉंग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे. जेष्ठांच्या या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील कॉंग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे.