ख्रिस गेल, डॅरेन सॅमी, डॅरेन ब्राव्हो, शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, रवी बोपारा, कॉलिन मन्रो, व्हर्नोन फिलेंडर व मुनाफ पटेल या काही नावाजलेल्या क्रिकेटपटूंनी लंका प्रीमियर लीग स्पर्धेसाठीच्या लिलावासाठी आपली नावे पाठवली आहेत. १ ऑक्टोबर रोजी होणार्या या लिलावात फ्रेंचायझींना जवळपास १५० खेळाडूंमधून आपले आवडते खेळाडू निवडता येणार आहेत.
प्रत्येक फ्रेंचायझीला कमाल ६ विदेशी खेळाडू निवडता येणार आहेत. त्यामुळे लंका प्रीमियर लीगमध्ये ३० आंतरराष्ट्रीय व ६५ स्थानिक खेळाडू दिसतील. प्रत्येक संघात कमाल १९ खेळाडू असतील. स्पर्धा १४ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत नियोजित आहे. स्पर्धेत एकूण २३ सामने खेळविण्यात येणार आहेत.
दाम्बुला, पालेकेल्ले व हंबनतोता येथे हे सामने होतील. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हंबनतोता येथे होईल. भारताच्या मुनाफ पटेलसह प्रवीण कुमार तसेच इरफान व युसूफ पठाणदेखील या स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. पठाण बंधूंना अजूनपर्यंत बीसीसीआयने ना हरकत दाखला दिला नसल्याचे समजते.