कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण कोविड सेंटरमध्ये जाण्यापेक्षा होम आयसोलेशनाचा पर्याय स्वीकारणे पसंत करीत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनलेला असला तरी, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत असल्याने सरकारी यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
घरी विलगीकरणात ७,३२१ रुग्ण
राज्यात कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या होम आयसोलेशनखालील संख्येने सात हजारांचा टप्पा पार केला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ७३२१ एवढी झाली आहे. सौम्य कोरोनाची लक्षणे असलेल्या होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध केला नसता तर कोविड केअर सेंटरवरील ताण वाढला असता. राज्यातील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी भरपूर जागा उपलब्ध आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनाचा पर्याय उपयुक्त ठरत आहे.
होम आयसोलेशनखालील कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आयएमए नियुक्त स्थानिक डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जात आहे.