थिम, मेदवेदेव, बार्रेटिनीची आगेकूच

0
128

ऑस्ट्रियाचा द्वितीय मानांकित डॉमनिक थिम व रशियाचा तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच सुरूच ठेवली. मेदवेदेवने केवळ एक तास ४८ मिनिटांत अमेरिकेच्या बिगरमानांकित जे.जे. वूल्फ याचा ६-३, ६-३, ६-२ असा फडशा पाडला तर थिम याने दोन तास २७ मिनिटे चाललेल्या लढतीत क्रोएशियाच्या ३१व्या मानांकित मरिन चिलिच याचा प्रतिकार ६-२, ६-२, ३-६, ६-३ असा मोडून काढला. स्पेनच्या आठव्या मानांकित रॉबर्टो बाटिस्टा आगुट याचा प्रवास मात्र तिसर्‍याच फेरीत थांबला.

कॅनडाच्या वासेप पॉस्पिसिल याने आगुटला मॅरेथॉन लढतीत ७-५, २-६, ४-६, ६-३, ६-२ असे हरविले. सहावे मानांकन लाभलेल्या इटलीच्या मारियो बार्रेटिनी याने तिसाव्या मानांकित कास्पर रूड या नॉर्वेच्या खेळाडूला ६-४, ६-४, ६-२ असे अस्मान दाखवले. रशियाच्या ११व्या मानांकित कारेन खाचेनोव याला मात्र बाहेरचा रस्ता धरावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या विसाव्या मानांकित आलेक्स दी मिन्यूर याने खाचेनोव याला ६-४, ०-६, ४-६, ६-३, ६-१ असे नमविले.

महिला एकेरीत द्वितीय मानांकित सोफिया केनिन व तृतीय मानांकित सेरेना विल्यम्स यांनी तिसर्‍या फेरीत अनुक्रमे स्लोन स्टीफन्स व ओन्स जाबुर यांच्यावर मात केली. २६व्या मानांकित केनिनने पहिला सेट ६-२ असा जिंकल्यानंतर सेरेनाने पुढील दोन्ही सेट ६-२, ६-२ असे जिंकत पुढील फेरी गाठली. केनिनने पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबल्यानंतर दुसरा सेट सहज खिशात घालत ७-६, ६-३ अशा विजयाची नोंद केली.