>> इरफान पठाणने व्यक्त केले मत
क्रिकेटचा देव मानल्या गेलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या अविश्वसनीय फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वास अनेक विक्रम पादाक्रांत केले. त्याच्या निवृत्तीला सात वर्षे उलटूनही त्याच्या फलंदाजीच महानता अजूनही कायम आहे. त्याने केलेले काही विक्रम अजूनही अबाधित आहेत. त्यात शतकांचे शतक म्हणजे ‘महाशतका’चा विक्रमाचा समावेश आहे. हा विक्रम मोडीत काढणे एक कठीण आव्हान आहे.
असे असले तरी माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणच्या मते मात्र सचिनच्या शंभर आंतरराष्ट्रीय शतकांचा हा विक्रम मोडण्याची क्षमता टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीमध्ये आहे आणि त्या दिशेने त्याने जोरदार पाऊलही टाकलेले आहे. अवघ्या १२ वर्षांत हा विक्रम मागे टाकण्यासाठी सर्वांत मजबूत दावेदार बनला आहे. त्याने आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत ७० आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद केलेली आहे. सचिननंतर दुसर्या स्थानावर असलेल्या पॉंटिंगची (७१ शतके) बरोबरी करण्यासाठी त्याला आता केवळ एका शतकाची आवश्यकता आहे. त्याची सध्याची क्षमता आणि तंदुरुस्ती पाहता तो निवृत्त होईपर्यंत हा विक्रम मोडू शकतो, असे इरफानचे मत आहे.
इरफानने स्टार क्रीडा शो ’क्रिकेट कनेक्ट’ वर बोलताना सचिनचा महाशतकाचा विक्रम हा फक्त भारतीयांनीच मोडला जावा अशी आपली इच्छा व्यक्त केली.
मला खात्री आहे की विराट १०० शतके नोंदवू शकतो. तो कदाचित याबद्दल बोलत नसेल पण सचिन तेंडुलकर नंतर तोच एक आहे. आम्हाला माहीत आहे की त्याने इतक्या कमी वेळात बरेच काही साध्य केले आहे आणि मला आशा आहे तो सचिनचा विक्रम मोडीत काढेल. सचिनने जेव्हा शेवटचे शतक होते केले तेव्हा मी त्याच्या प्रवासाचा एक भाग होतो, असे इरफान म्हणाला.
उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहली हा एकमेव सक्रिय फलंदाज आहे ज्याने ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल अनुक्रमे ४३ आणि ४२ आंतरराष्ट्रीय शतकांसह दुसर्या व तिसर्या स्थानावर आहेत.