जसपाल राणा यांना मिळणार ‘द्रोणाचार्य’

0
130

माजी नेमबाज तथा विद्यमान प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नाव यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या १२ निवड समितीने निश्‍चित केले असल्याचे वृत्त आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ इंडियाने राणा यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शिफरास केली होती. राणा यांच्यासह १३ प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड निश्‍चित झाली असल्याचे समजते. आज होणार्‍या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या बैठकीत सर्व पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित होणार आहेत.