लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण

0
340

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आपणाला कोरोनाची लागण झाली असून आपण घरीच विलगीकरण केले असल्याचे ट्विट करून सांगितले आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी घरी विलगीकरणात आहे. माझ्यासोबत कार्यरत असलेले कर्मचारी आणि मित्रांनी स्वत:कडे लक्ष द्यावे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाईल, अशी माहिती लव अग्रवाल यांनी ट्विटरवरून दिली.