>> संपूर्ण चीन, पाकपर्यंत मारा करण्याची क्षमता
> अग्नीचे खास वैशिष्ट्य
> ५ हजार किलोमीटर पर्यंत मारा
> हजारपर्यंत वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता
> संपूर्ण आशिया, युरोप व आफ्रिका टप्प्यात
> १७ मीटर लांबी, ५० टन वजन
> लॉंचिंगमध्ये कॅनस्टर तंत्रज्ञान
> कुठेही वाहून नेणे शक्य
सर्वांत लांब पल्ल्याचा मारा करणार्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची ओडिशामधील व्हीलर द्वीप येथे काल यशस्वी चाचणी झाली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांनी ही माहिती दिली. अण्वस्त्र हल्ल्यासाठी अग्नी-५ सक्षम असून अशा प्रकारचे क्षेपणास्त्र तयार करणारा भारत जगातील पाचवा देश आहे.
या क्षेपणास्त्राने पाकिस्तान, चीन, युरोप पर्यंतही थेट हल्ला करता येऊ शकतो. अवघ्या २० मिनिटांत पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. अग्नी क्षेपणास्त्राच्या यापूर्वी ३ चाचण्या झाल्या होत्या. जमिनीवरून जमिनीवर मारा करता येणार्या मध्यम पल्ल्याचे आंतरखंडीय बेलेस्टिक रेंजचे हे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीत ८५ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आरएलजी (रिंग लेझर गायरोस्पेस) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने ते अधिक लक्ष्यभेदी ठरणार आहे.