सुदिन ढवळीकरांना मंत्रिपदावरून काढून टाकावे : दत्तप्रसाद नाईक

0
150

ताळगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे अशी मागणी केली आहे. आपण तशी मागणी भाजपच्या सर्व पदाधिकार्‍यांकडे केली असल्याचे त्यांनी काल पत्रकारांना सांगितले. मगो पक्षाबरोबर भाजपने युती केल्याने आमची दुर्दशा झाली आहे, ताळगाववासीयांचे हाल झाले आहेत असेही नाईक यांनी सांगितले.

मगोला सरकारात घेण्याची गरजच नव्हती
२०१२ च्या निवडणुकीत भाजपचे २१ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे ढवळीकर यांना सरकारात घेण्याची गरजच नव्हती. भाजपने ढवळीकर यांच्यावर उपकार केले आहेत. असे असतानाही गेली चार वर्षे ताळगाव मतदारसंघात पाण्याचा पुरवठा होत नाही, मलनिस्सारण प्रकल्पाचे कामही पुढे जात नाही. जमिनीखालचे पाणी प्रदूषित झाले आहे.