‘युवा संवाद’चे अर्ज स्वीकारण्यासाठी १६ केंद्र

0
106

गोवा युवा संवाद योजनेची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जीइएलने अर्ज वितरीत करण्यासाठी सोमवारपासून वेगवेगळ्या ठिकाणी मिळून १६ केंद्रे उघडण्याचे ठरविले आहे. दरम्यानच्या काळात आणखी ४२ केंद्रे सुरू केल्यानंतर सर्व केंद्रावर युवकांकडून अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती जीइएलचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी काल पत्रकारांना दिली.

वरील योजनेचा लाभ घेणार्‍या १६ ते ३० वयोगटातील युवकांना पाच वर्षांच्या येथील वास्तव्याचा पुरावा, तसेच आधार कार्ड सादर केल्यानंतर इकेव्हायसी पध्दतीने तपासणी केली जाईल व आवश्यक ती सर्व माहिती एसएमएसच्या माध्यमातून कळविली जाईल. वरील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच सीम कार्ड उपलब्ध केले जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
दरमहा शंभर तिकिटे मोफत टॉकटाईम, वॉलेट, ३ जीबी इंटरनेट डाटा अशी ही योजना असून त्यासाठी प्रती युवकावर १२५ रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत जीइएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती मुजुमदार, ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण बोरकर उपस्थित होते.