कॅशलेश अर्थव्यवस्थेसाठी पुढाकार घ्या

0
123

>> मोदींचे तरुणांना आवाहन

 

नोटाबंदी निर्णयानंतर ‘मन की बात’मधून पहिल्यांदाच देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पुनरुच्चार केला.
कॅशलेस अर्थव्यवस्था सुरक्षित असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले की, कार्ड पेमेंट, इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट करणे शिकायला हवे. पालकांना किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना कदाचित याबद्दल माहिती नसेल. मात्र, ट्रेनचे तिकीट ऑनलाइन बुक कसे करायचे, वस्तू ऑनलाइन कशा ऑर्डर करायच्या, याची माहिती युवा पिढीला आहे. त्यांनी ती केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर छोट्या व्यावसायिकांनादेखील सांगून डिजीटल पेमेंटचे फायदे पटवून द्यावे व कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मोदी यांनी केले. डिजीटल अर्थव्यवस्था कसे काम करते हे समजून घ्यायला हवे. फोनमधून विविध बँकांचे ऍप्स कसे वापरायचे, हे शिकून घ्यायला हवे असे आवाहन त्यांनी केले.