>>गोव्यासमोर नवा पेच
म्हादई पाणीतंटा प्रकरणी महाराष्ट्राने सादरीकरण करण्यापूर्वी कर्नाटकाला ७ टीएमसी पाणी वळवण्यास मान्यता द्यावी असे लवादाला कळविल्याने गोव्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. १२ जुलै रोजी म्हादई प्रश्नी दिल्लीत लवादासमोर सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्राच्या या नव्या चालीमुळे गोव्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रश्नावर दोन्ही शेजारी राज्यांबरोबर वावरताना आता गोव्याला खूपच सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे. महाराष्ट्राने कर्नाटकाला दिलासा देताना आपले ईप्सित साध्य करण्यासाठी चाल खेळली असल्याचा आरोप होत आहे. गोव्यातर्फे सोमवारी लवादासमोर उत्तर सादर करण्यात येणार असल्याची माहिती ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी दिली.
दरम्यान, गोव्याच्या कायदा पथकाला धमकावण्याचे प्रकार सुरू झालेले असल्याने खळबळ माजली आहे. हे प्रकरण गंभीर असून याबाबत राज्य शासनाने अतिशय कडक भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.